महाराष्ट्र सायबरची लॉकडाऊनच्या काळात उल्लेखनीय कारवाई सुरूच, ४४४ गुन्हे दाखल

इंडिया क्राईम डाटा डेस्क

मुंबई, 30 मे 2020

सध्या कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यातील,काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सायबर अशा गुन्हेगार व समाजकंटक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी व त्यांना पकडण्यासाठी सर्व आयुक्त व जिल्हा पोलीस प्रशासना बरोबर समन्वय साधून काम करीत आहे.

महाराष्ट्र सायबर या करिता टिकटॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य social media वर चालणाऱ्या गैरप्रकारांवर बारीक लक्ष ठेवून आहे.

या लॉकडाउनच्या काळात महाराष्ट्र सायबरने अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण ४४४गुन्ह्यांची (ज्यापैकी २६ N.C आहेत) नोंद २९ मे २०२० पर्यंत झाली आहे. त्याची प्रामुख्याने जिल्ह्यानुसार आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.

या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १८५ गुन्हे दाखल झाले आहेत, तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी १७५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, tiktok विडिओ शेअर प्रकरणी २३ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ८ गुन्हे दाखल झाले आहेत, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत.

अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्या प्रकरणी ४९ गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत २३८ आरोपींना अटक केली आहे.

यापैकी १०५ आक्षेपार्ह पोस्ट्स takedown करण्यात यश आले आहे.

नाशिक ग्रामीण पोलीस जिल्ह्यातील पेठ पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे, त्यामुळे सदर जिल्ह्यातील गुन्ह्यांची संख्या १७ वर गेली आहे.

सदर गुन्ह्यातील आरोपीने आपल्या फेसबुक प्रोफाईलवर, कोरोना महामारीबाबत आणि त्यावरील उपचारांबाबत चुकीची व खोटी माहिती असणाऱ्या आशयाची पोस्ट शेअर केली होती.

त्यामुळे परिसरात अफवा पसरून संभ्रम निर्माण झाला होता.

सध्या लॉकडाउनच्या काळात बरेच नागरिक Work From Home करत आहेत, त्यामुळे आपल्या सहकाऱ्यांबरोबरच्या सर्व मिटिंग्ज ऑनलाईन करत आहेत.

या ऑनलाईन मिटींग्ज करिता zoom, microsoft meetings, skype, cisco webex इत्यादी सॉफ्टवेअरस/apps वापरली जात आहेत, त्यामध्ये वापरायला सोपे असल्याने zoom या सॉफ्टवेअरचा जास्त प्रमाणात उपयोग होत आहे.

महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विशेष करून zoom app वापरणाऱ्यांना विनंती करते कि हे अँप वापरताना सावध राहा.

सायबर भामट्यांनी zoom app सदृश्य काही malware व फेक अँप्स बनवली आहेत.

तुम्ही जर ती डाउनलोड केलीत तर तुमच्या सर्व मिटींग्ज रेकॉर्ड होतील व तुमची सर्व माहिती त्यांना मिळू शकते व तुमच्या device (मोबाईल /संगणक) चा ताबा देखील हे सायबर भामटे घेऊ शकतात.

या फेक फाइल्सची नाव खालील प्रमाणे आहेत.

तरी सर्व नागरिकांनी झूम अँप हे अधिकृत वेबसाईट किंवा प्लेस्टोअरवरूनच डाउनलोड करावे. शक्यतो कुठलीही confidential माहिती अशा मिटींग्समध्ये बोलणे टाळावे किंवा संबंधित लोकांशी थेट बोलूनच त्यांना हि माहिती द्यावी.

मिटिंग ऍडमिनने मिटिंगचे Id व पासवर्ड हे शक्यतो संबंधित व्यक्तींनाच थेट कळवावेत, तसेच सदर पासवर्ड हा थोडा क्लिष्ट ठेवावा जेणेकरून एखाद्या दुसऱ्या व्यक्तीस तो समजण्यास कठीण जाईल.

तसेच संबंधित मिटिंग ऍडमिन /होस्टने फक्त मिटिंगच्या विषयाच्या संबंधित व्यक्तींची login request accept करावी. केंद्र व राज्य सरकार वेळोवेळी जे नियम व आदेश प्रसिद्ध करतील त्याचे पालन करा व गरज नसल्यास कृपया घराच्या बाहेर पडू नका.  

   

Leave a Reply

%d bloggers like this:
Web Design BangladeshBangladesh Online Market