पोलिसांनी स्फोटकांनी भरलेल्या कारच्या मालकाचा शोध घेतला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था :

29 May 2020

पोलिसांनी स्फोटकांनी भरलेल्या कारच्या मालकाचा शोध घेतला आहे. ती गाडी तीन लाखांचा इनाम असलेल्या हिज्ब दहशतवादी हिदायतुल्लाह मलिक याची असल्याचे समजते. त्याला पकडण्यासाठी त्याच्या ठिकाणांवर सतत दबाव आणला जात आहे. पुलवामा पोलिसांनी आज हिदायतुल्लाच्या कुटुंबीयांना चौकशीसाठी पोलिस स्टेशनला बोलावले होते.

आतापर्यंत पोलिसांनी यासंदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र, हिदायतुल्लाचा जोमाने शोध घेण्यात येत असून कुटुंबातील सदस्यांना यात मदत करण्यास सांगितले जात आहे. दरम्यान, जैश आणि हिज्बच्या दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा 14 फेब्रुवारी 2019 प्रमाणे दक्षिण काश्मीरमध्ये मोठा आत्मघाती हल्ला करण्याचा कट रचला होता. या प्लॅनमध्ये वापरल्या जाणाऱ्या गाडीला पोलिसांनी बुधवारी रात्री ताब्यात घेत सुरक्षितपणे उद्ध्वस्त केली.

दरम्यान,आता ही कार हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी हिदायतुल्ला मलिकची असल्याचे म्हंटले जात आहे. तो शोपियां जिल्ह्यातील शरदपोरा गावचा रहिवासी आहे. दरम्यान, आणखी एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, 30 जुलै 2019 रोजी हिदायतुल्ला मलिक दहशतवादी बनला होता. या वर्षाच्या सुरुवातीला सी श्रेणीतील दहशतवाद्यांमध्ये त्यांची नोंद होती. त्यावर तीन लाखांचे बक्षीस आहे.

पुलवामा हल्ल्यासारखा रचला होता कट :

सुरक्षा दलाने दहशतवाद्यांचा पुलवामा हल्ला घडवून आणण्याचा कट मोडीत काढल्याने मोठी दुर्घटना टळली. हिज्बुल मुजाहिद्दीनने 45 किलो स्फोटकांनी सज्ज असलेल्या एका सेन्ट्रो कारने जम्मू-श्रीनगर महामार्गावर किंवा पुलवामामध्ये सुरक्षा दलाच्या ताफ्यावर मोठ्या हल्ला करण्याची योजना आखली होती. परंतु सुरक्षा दलांनी राजपोरा (पुलवामा) येथे बॉम्ब कारला सुरक्षितपणे स्फोट करून उडवून दिले. हिजबुलचा दहशतवादी आदिल हा स्फोटकांनी भरलेली कार चालवत होता, जो घटनास्थळावरून पळाला.

Hidayatullah Malik Hizbul Mujahideen militant resident of Sharatpora Shopian

पोलिस महासंचालक दिलबाग सिंह म्हणाले की, हल्ल्याचा कट जैश, लष्कर आणि हिजबुल यांनी रचला होता. त्याच कारमध्ये आयईडीला सात लाख रुपयांचा इनाम असणारा जैशच्या दहशतवादी मूसा उर्फ वलीद उर्फ इद्रीसने एका अन्य जैश कमांडर फौजी भाई सह मिळून फिट केले होते. पाकिस्तानचा वलीद मे 2015 पासून काश्मीरमध्ये सक्रिय असल्याचे म्हटले जात आहे. 2017 पासून सक्रिय असलेल्या फौजी भाईवर पाच लाखांचे बक्षीस आहे. कारवरील नंबर प्लेट JK08B-1426 कठुआ येथील बीएसएफ जवानांच्या मोटरसायकलचा आहे. बीएसएफच्या जवानांचीही चौकशी करण्यात आली आहे.

एनआयएच्या पथकाने केली चौकशी :

एनआयएने राजपोरा येथील स्फोट जागेचा आढावाही घेतला आहे. या प्रकरणाची चौकशी एनआयएकडेदेखील सोपविली जाऊ शकते. ही स्फोटकाने भरलेली कार आणि मागील वर्षातील पुलवामा हल्ल्याच्या तारा जुळल्याचे दिसत आहेत. आयईडीमध्ये आरडीएक्सशिवाय अमोनियम नायट्रेट, नायट्रेट ग्लिसरीन आणि सल्फर देखील वापरले गेले आहेत.

आयजीपी काश्मीर विजय कुमार यांनी सांगितले की, जैशचा दहशतवादी वलीद आणि फौजी यांनी 11 मे रोजी पाक रमजान महिन्याच्या 17 व्या दिवशी जंग-ए-बद्रच्या दिवशी सुरक्षा दलांवर हल्ला करण्यासाठी कार बॉम्ब तयार केला होता. सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे ते त्यादिवशी हल्ला करु शकले नाही. यानंतर हिज्बुल बरोबर त्यांनी हल्ल्याचा कट रचला. हिजबुलचा दहशतवादी आदिल यासाठी निवडला गेला. बुधवारी आदिल स्फोटकांनी भरलेल्या कारची जागा बदलण्याचा प्रयत्न करीत होता.

मोठ्या दहशतवादी हल्ल्याची मिळाली सूचना :

पुलवामा येथे दहशतवादी मोठा हल्ला करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता सीआरपीएफ आणि लष्कराच्या 44 आरआर जवानांसमवेत पुलवामामध्ये दक्षता वाढविली. रात्री साडेदहाच्या सुमारास पुलवामा येथील राजपोरा भागातील नाक्यावर सुरक्षा दलाने पांढऱ्या रंगाच्या सेन्ट्रो कारला थांबायला सांगितले, परंतु ड्रायव्हरने गाडी वेगाने घेत तिथून फरार झाला.

त्या नाक्यावरून दुसऱ्या नाक्यावर या संदर्भात माहिती देण्यात आली. अयानगुंडजवळील सैनिकांनी गाडी थांबविण्याचे संकेत दिले. अडथळा पाहून ड्रायव्हरने कार अरुंद रस्त्यावर वळवण्याचा प्रयत्न केला. यावर सैनिकांनी गोळीबार केला आणि कारचा टायर पंच झाला. दहशतवादी कार चालवतच राहिला, पण यश मिळू शकले नाही आणि सैनिकांवर गोळीबार करत तो तेथून अंधारात पळून गेला. त्यांनतर गाडी ताब्यात घेतली गेली. गाडीचा ड्रॉयव्हर आदिलचा शोध सुरू आहे, परंतु कोणताही क्लू सापडला नाही.

सीआरपीएफचे 400 जवान दहशतवाद्यांच्या निशाण्यावर :

घाटीतील सुरक्षा दलांच्या दबावामुळे आणि महत्त्वाच्या कमांडर्सच्या हत्येनंतर हताश अतिरेकी गट हिजबुल मुजाहिद्दीनने जैश-ए-मोहम्मदसोबत गुरुवारी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हल्ला करण्याचा कट रचला. दहशतवाद्यांच्या निशाण्यावर सुमारे 400 सीआरपीएफ जवान आणि अधिकाऱ्यांचा काफिला होता. गेल्या गुरुवारी राजपोरा (पुलवामा) येथे अयशस्वी झालेल्या कार बाँब प्रकरणाच्या चौकशीशी संबंधित मिळालेल्या माहितीनुसार दहशतवादी सकाळीच हल्ला करणार होते.

म्हणूनच दहशतवाद्यांनी बुधवारी रात्री त्यांच्या सेफ हाऊसमधून कार बॉम्ब बाहेर काढून महामार्गावर नेण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी सकाळी श्रीनगरहून जम्मूसाठी निघालेल्या सीआरपीएफच्या 20 वाहनांच्या ताफ्यावर हल्ला होऊ शकतो, अशी माहिती मिळाली होती. सकाळी सात वाजता हा काफिला श्रीनगरच्या बक्षी स्टेडियमवरुन रवाना झाला. यात सुमारे 400 सैनिक आणि अधिकारी असतात. ज्या परिस्थितीत गाडी पकडली गेली आहे .

त्या परिस्थितीचा विचार करता, दहशतवाद्यांचे लक्ष्य सीआरपीएफचा काफिला असेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. ते म्हणाले की, दक्षिण काश्मीरमध्ये गेल्या वीस दिवसांत दहशतवाद्यांच्या कारवायांविषयीची माहिती खासकरुन पुलवामा, पामपोर आणि अवंतीपूर या भागांतही दिली गेली. दहशतवाद्यांचा हल्ला होण्याची शक्यता पाहता सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. महामार्गाच्या सुरक्षा व्यवस्थेत आणि सर्व सुरक्षा आस्थापनांमध्ये व्यापक बदलांमुळे हे आणखी मजबूत करण्यात आले.

पुलवामा हल्ल्यात 40 जवान शहीद:

दरम्यान, 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा येथील लिट्टर येथे सीआरपीएफच्या काफिल्यावर हल्ला करण्यात आला होता, ज्यात एका दहशतवाद्याने आयईडीने सुसज्ज गाडीने सुरक्षा दलाच्या वाहनाला धडक दिली होती. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले.

याचा बदला भारतीय वायुसेनाने 26 फेब्रुवारी 2019 रोजी पाकिस्तानात घुसून बालाकोटमधील जैशच्या दहशतवादी तळांवर बॉम्ब हल्ला करुन त्यांना नष्ट केले.

Story Contribution From:

This content is from the contributor and not edited by India Crime. The content is published as received.

Leave a Reply

%d bloggers like this:
Web Design BangladeshBangladesh Online Market