इस्लामोफोबिया: भारताविरूद्ध खोटे सांगण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानला पुन्हा अपयश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था:

29 May 2020

संयुक्त राष्ट्रात भारताविरूद्ध खोटे सांगण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानला पुन्हा अपयश आले आहे.

पाकिस्तानने इस्लामिक सहयोग संघटनेच्या (ओआयसी) बैठकीत भारतात इस्लामोफोबियाच्या मुद्द्यावर अनौपचारिक गटाची स्थापना करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पण मालदीव आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) यांनी त्यांचा प्रस्ताव पूर्णपणे नाकारला.

पाकिस्तानने इस्लामोफोबियाचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानचे स्थायी प्रतिनिधी मुनीर अकरम यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ओआयसी राजदूतांच्या बैठकीत भारतात कथित इस्लामोफोबियाचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला.

ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षाकडून मुस्लिम आणि काश्मिरींवर अत्याचार होत आहेत.

खानही म्हणाले की, कोरोना काळात भारतात मुस्लिमांविरूद्ध द्वेष आणखी वाढला आहे.

मोदी सरकारने नियम बदलून जम्मू-काश्मीरमध्ये गैर-काश्मिरींना कायमस्वरुपी नागरिक होण्याचा अधिकार दिला आहे हेही सांगण्याचा प्रयत्न केला.

Story Contribution From:

This content is from the contributor and not edited by India Crime. The content is published as received.

Leave a Reply

%d bloggers like this:
Web Design BangladeshBangladesh Online Market